Sunday, 7 December 2008

हम सब एक हे !

 अतिरेक्क्यानो...

मारून मारून मारल किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़न्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्रयांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे


तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने नकटे नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कलुन चुकल्या आहेत
झाडल्या गोल्या ,फोडले बोंम्ब
तय आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज कडून टाका
तुम्ही आम्हाला गुलाम करताल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हाणित
तिरंग्याला सलाम करताल !!
जय भारत…….. जय महाराष्ट्र……

हम सब एक है
 

Tuesday, 4 November 2008

INDIA


Area : 3,300,000sq km
Country population : 1,028,610,328
Capital city: New Delhi
Official languages:
              18  languages are listed as official. Hindi is the national  language & the main link language.
               & English is widely used. There are 800 languages and spoken across the country.
Currency: Indian rupee

फ़कत आणि फ़कत देशासाठी

लोक हो.... समजुन घ्या.
चोरी करा-सदगुनांची
जालपोल करा-वाईट गुणांची
लाथा मारा- व्यसनाना
खून पाड़ा- रागाचा 
शिव्या दया- मत्सराना
कालाबाजार करा- बन्धुत्वाचा
हाकलून लावा-दुबलेपना
थूंका-आलसावर
वेडे व्हा- शिक्षानासठी
मरा-फ़कत आणि फ़कत देशासाठी 

Monday, 3 November 2008

१५ ऑगस्ट

आज १५ ऑगस्ट ना ग…
आनंदाने भरून आलाय ऊर
पण घरीच सुट्टी एन्जॉय करूया
झेंडावंदनाचं ठिकाण आहे दूर…


सांग भारतात स्टेट्स आहेत किती ?
असतील पंचवीस तीस
आपल्याला स्टेट्स म्हणजे यु.एस. एवढंच माहिती..!


सांग वंदे मातरम कुणी बरं लिहिलंय ?
कुणी लिहिलंय ते ठाऊक नाही
पण ए. आर. रेहमानने काय गायलंय !


पण सोड ना हे प्रश्न
यांची आता काय गरज !
“कौन बनेगा करोडपती” संपून
झालेत बरेच दिवस !


मग आश्वासनं आणि स्वप्नं विका
उद्याच पडणार ठाऊक आहे
त्यांचा रंग फ़िका..!

मग म्हण “विविधतेत एकता”
वर्षभर मग हवी तेवढी
चिखलफ़ेक करू शकता..!


“मेरा भारत महान” जगाला ओरडून सांग .
उद्या लावायचीय व्हिसासाठी
अमेरिकन वकिलातीसमोर रांग.


चल इतिहास आणि संस्कृतीवरची धूळ एका दिवसापुरती झटकूया .
आणि चटावरच्या श्राद्धासारखे
सत्कार समारंभ उरकूया .