Thursday, 19 February 2009

शिवचरित्र्यातुन काय शिकावे?


शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे.  शिवचरित्र्यातुन आज आपणाला  खुप जीवनमूल्य शिकता येण्यासारखी आहे. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले.. त्यांच्यावर खुप संकटे चालून आली. खुप शत्रुन्शी महाराजानी मोठ्या ध्र्येयांनी मुकाबला केला. म्हणजे शिवाजी महाराज संकट समयी घबरनारे  नव्हते,तर लधनारे होते. आज तरुनान्नी संकट समयी हताश, निराश ना होता खुप आत्मविश्वासाने संकटाविरुध्य लाधान्याची प्रेरणा  शिवचरित्र्यातुन  घ्यावी.  शिवचरित्र्यातुन आज आपण प्रयान्त्वाद शिकला पाहिजे. शिवाजी महाराज नीरव्यसनी होते, त्यांचे सर्व मवालेही नीरव्यसनी होते. त्यामुलेच शिवाजी राजे यशस्वी जाले. 

 शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी||
शिवरायांचे कैसे बोलणे|शिवरायांचे कैसे चालाणे|  
शिवरायांची सलगी देणे|कैसी असे||  
सकल सुखांचा केला त्याग|म्हाणोनी साधिजे तो योग|  
राज्य साधनाची लगबग|कैसी केली||  
याहुनी करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरूष|  
या उपरी आता विशेष|काय लिहावे||  
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे|  
इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||  
निश्च्यायाचा महामेरू|बहुत जनांसी आधारू|  
अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी|

उष:काल होता होता काळ रात्र झाली.. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !...