Sunday, 26 April 2009

मी महाराष्ट्र बोलतोय sss...

'राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा...' महाराष्ट्राच हे वर्णन कधीतरी लहानपणी कवितांच्या ओलिंमध्ये वाचल होत; प्रत्यक्षात मात्र आता अनुभवल एलेक्षनाच्या निमित्ताने. महाराष्ट्राचा मत समजुन घेण्यासाठी आम्ही २५ मार्च रोजी निघालो आणि पंचवीस दिवस महाराष्ट्रभर हिंडलो. लोकांच्या समस्या 
समजुन घेतल्या, राजकार्नांच्या सभा आमच्यासाठी दुय्यम होत.  आम्हाला समजुन घ्यायच होत समन्याताल्या सामान्य मानचाच मत. सामान्य माणसाला केद्रस्थानी ठेउनच आम्हाला महाराष्ट्र बोलता करायचा होता.
                                                                            राज्यातल्या जवलपास प्रत्येक विभागात व प्रत्येक जिल्ह्यात पाण्याची टंचाई, बंद पडत चाललेले उद्योकधंदे आणि बेरोजगारी, या समस्यानी खरोखरच उग्र रूप धारण केलेय.    

Monday, 6 April 2009

धोबीपछाड



गेले काहि दिवस माती मऊ आहे म्हणुन ती मुळाने खणण्याचा अट्टाहास काहि जण करीत आहेत. पण आता परीस्थिती अति झालं आणि हसु आलं याच्याहि बाहेर गेलीये. मुळात फक्त ब्राह्मण द्वेष हा एक आणि एकच अजेंडा काहि संस्थांकडुन अव्याहत राबवला जातोय. आणि त्याला कोणाचा राजकिय पाठिंबा आहे हे उघड-गुपित आहे.

तसा मूळातुन विचार करता ब्राह्मण समाजाने दलितांवर बरेच अत्याचार केले आहेत हा सत्य इतिहास आहे. पण सगळं खापर जे एकट्या ब्राह्मणांवर फोडलं जातय त्यात मात्र तथ्य नाहिये. उलट ब्राह्मण समाजापेक्षाहि काकणभर जास्त इतर वर्णांनी त्रास दिलाय. बर्‍याच दलित नेत्यांनी तसं स्पष्टपणे ऐकवले सुध्दा आहे. सध्या ब्राह्मणांवर गरळ ओकण्याचा जो काहि हिन प्रकार सुरु आहे तो शिसारी आणणारा आहे. फुले-आंबेडकर-शाहु-शिंदे यांनी देखिल इतक्या खालच्या थराला जाऊन ब्राह्मणांवर गरळ ओकली नव्हती. आणि तसे बघता यांचे काहि सहकारी अथवा यांना पाठिंबा देणारे काहि जण तर ब्राह्मणच होते. महात्मा फुलेंना शाळेसाठि जागा देणारे “भिडेच” होते. बालगंधर्व तर शाहुंच्या गळ्यातील ताईतच होते, इतके कि शाहुंचे उजवे हात समजले जाणारे जाधव प्रभुती देखिल “तुम्हांला बालगंधर्व जास्त जवळचे वाटतात !” असे हिरमुसुन म्हणताना दिसतात. शिंदे तर टिळकांच्या जवळच्या व नंतर तात्विक वादांमुळे दुर गेलेल्यांपैकी एक. महर्षी शिंदे यांनी सावरकरांवर त्यांच्या जात्योच्छेदनाच्या कार्यामुळे जाहिर स्तुतीसुमने उधळली होती. थोडक्यात सामाजिक-राजकिय अथवा तात्विक कारणांनी वरील प्रस्थापितांनी ब्राह्मणांवर कडक ताशेरे ओढले होते पण त्यांनी “गरळ” ओकली नव्हती. उलटपक्षी टिळक-शाहु वादात एका केस संबधी काहि अति गोपनीय कागद टिळकांपर्यंत पोहोचतील व टिळकांना त्यांचीच बाजु भक्कम करता येईल अशी व्यवस्थाच शाहुंने केल्याचा उल्लेख मिळतो. याबाबत प्रबोधनकारांनी शाहुंना प्रश्न विचारल्यावर “अरे तो(लोकमान्य टिळक) तिथे इंग्रजांशी एकहाती झुंज घेत असताना त्याच्या मार्गात कुटल्याहि कारणाने आम्हि का यावे?” असे उत्तर दिले. आणि आज त्याच टिळकांवर “लोकमान्य कसला भटमान्यच” असे एकेरी शेलकी विशेषण लावत हे फिरत आहेत. आणि अशी शेलकी-निर्बुध्द विशेषणे एकट्या लोकमान्यांवरच नव्हे तर “ब्राह्मण” असलेल्या प्रत्येकावर चिकटवत फिरत आहेत
आता दादोजी कोंडदेव-समर्थ रामदास स्वामी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सामाजिक-राजकिय संबधांवर बोट ठेवण्यात येत आहे. तसा तर हा वाद जुनाच आहे. सुरुवात महात्मा फुल्यांनी केली. “गागाभट्ट व रामदासाने निरक्षर शिवाजीस गोड बोलुन फसविले!” अशी एक ओळ देखिल त्यांच्या लिखाणात सापडते. पण छत्रपती शिवाजी महाराज हि व्यक्ती निरक्षर मुळिच नव्हती व समोरचा गोड बोलतोय म्हणुन फसेल अशी तर नव्हतीच नव्हती. भारतात जे “द्रष्टे” झाले त्यापैकी एक असलेले शिवराय अश्या भुलथापांना बळि पडत असते तर स्वराज्य उभे राहिलेच नसते. महाराज काळाच्या फार पुढचा विचार करायचे. आणि महाराजांना माणुस ओळखता यायचा म्हणुनच “आम्हि महाराजांचे सेवक, तुझा कौल कोण घेतो? शिवशंभु आम्हांस हसेल!” असे म्हणत दिलेरखानावर दातओठ खाणारा मुरारबाजी पुरंदरावर स्वराज्यासाठी पडला. अशी माणसे गोळा करुन एकत्र आणणारे शिवराय गागाभट्ट व रामदास स्वामी यांना ओळखणार नाहित काय?

विषय निघालाच आहे तर सांगतो कि गागाभट्ट व शिवराय काहि राज्यभिषेकाच्या निमित्तानेच एकत्र आले नव्हते. तर त्याच्याहि आधी बरीच वर्षे म्हणाजे निदान ८-१० वर्षे आधी शेणवी समाज्याच्या निवाड्यात गागाभट्ट शिवाजीराजे जो निर्णय देतील तो मान्य करावा. असे विधान करतात. आता गागाभट्टांसारखा वेदशास्त्रसंप्पन दशग्रंथी ब्राह्मण एका जातीच्या निवाड्यात राज्याभिषेका आधीच राजांना न्याय देण्यास सांगतो म्हणजे गागाभट्टांना शिवरायांचे कार्य व त्यांची निर्विवाद योग्यता आधीच माहित होती असे दिसते. दुसरी गोष्ट – राज्याभिषेक झाल्यावरच राजाला अथवा त्या क्षत्रियाला ब्राह्मणांच्या सामाजिक-धार्मिक अथवा कौटुंबिक प्रश्नात निर्णय देता येत असे. गागाभट्टांना जर महाराजांना फसवायचे होते तर त्यांना राज्यभिषेक करवलाच कसा? कारण त्यांना ब्राह्मणसमाजाचे वर्चस्व अबाधित ठेवायचे होते तर कितीहि दक्षीणा दिली तरी त्यांनी महाराजांना राजेपद द्यावयास संमती दिलेच नसती. आणि कोटी रुपये दक्षीणा अथवा यांच्याच भाषेत सांगायच तर “लाच” हि गागाभटांसाठि मोठी गोष्ट नव्हती. काशी क्षेत्रीचा वेदोमुर्ती म्हंटल्यावर पैसा-मानमरातब-प्रसिध्दि हे त्यांना अज्जिबात नविन नव्हतं. ती दक्षीणा मिळणारच होती. यांचा अजुन एक आक्षेप असतो की “माझ्या हातुन काहि प्रमाद घडल्यास अथवा मी माझी राजाची कर्तव्ये पार पाडण्यात कसुर केल्यास, राजगुरु माझ्या मस्तकावर धर्मदंडाचा प्रहार करुन मला पदच्युत करतील!” अशी शपथ महाराजांना घ्यायला लावली होती. इथे त्यांना बामनी कावा वाटतो, पण जर महाराजांना प्रजेचा निवाडा करण्याचा हक्क असेल तर राजावर देखिल एखादा अंकुश असलाच पाहिजे. मुळात धर्मसत्ता व राजसत्ता यांना एकमेकांचा धाक नसेल तर राज्य टिकत नाहि. गावचा पाटिल झाला म्ह्णुन गावच बुडवावा का? ते तसे होऊ नये म्हणुन गेली हजारो वर्षे भारतातच नव्हे तर जगभर राजसत्ता-धर्मसत्ता एकमेकांना धरुन असतात. याचा अर्थ राजा वाईट असतो म्हणून नव्हे तर आअपल्यावर जी जबाबदारी आहे ती आपण पार पाडतो अहोत की नाहि हे बघणारं कोणी असेल तर काम नीट होतं. इथे तर समाजाचा प्रश्न अहे. आणि एकट्या शिवरायांनाच नव्हे तर कुठल्याहि राजाला हि शप्पथ घ्यावीच लागायची.

Thursday, 19 February 2009

शिवचरित्र्यातुन काय शिकावे?


शिवचरित्र हा पदोपदी प्रेरणा देणारा दीपस्तंभ आहे.  शिवचरित्र्यातुन आज आपणाला  खुप जीवनमूल्य शिकता येण्यासारखी आहे. शिवरायांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून रयतेचे स्वराज्य निर्माण केले.. त्यांच्यावर खुप संकटे चालून आली. खुप शत्रुन्शी महाराजानी मोठ्या ध्र्येयांनी मुकाबला केला. म्हणजे शिवाजी महाराज संकट समयी घबरनारे  नव्हते,तर लधनारे होते. आज तरुनान्नी संकट समयी हताश, निराश ना होता खुप आत्मविश्वासाने संकटाविरुध्य लाधान्याची प्रेरणा  शिवचरित्र्यातुन  घ्यावी.  शिवचरित्र्यातुन आज आपण प्रयान्त्वाद शिकला पाहिजे. शिवाजी महाराज नीरव्यसनी होते, त्यांचे सर्व मवालेही नीरव्यसनी होते. त्यामुलेच शिवाजी राजे यशस्वी जाले. 

 शिवरायांचे आठवावे रूप|शिवरायांचा आठवावा प्रताप|
शिवरायांचा आठवावा साक्षेप|भुमंडळी||
शिवरायांचे कैसे बोलणे|शिवरायांचे कैसे चालाणे|  
शिवरायांची सलगी देणे|कैसी असे||  
सकल सुखांचा केला त्याग|म्हाणोनी साधिजे तो योग|  
राज्य साधनाची लगबग|कैसी केली||  
याहुनी करावे विशेष|तरीच म्हणवावे पुरूष|  
या उपरी आता विशेष|काय लिहावे||  
शिवरायांसी आठवावे|जीवित तृणवत मानावे|  
इहलोकी परलोकी उरावे|किर्तिरुपे||  
निश्च्यायाचा महामेरू|बहुत जनांसी आधारू|  
अखंड स्थितीचा निर्धारू|श्रीमंत योगी|

उष:काल होता होता काळ रात्र झाली.. अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली !...

Monday, 26 January 2009

गरिबांच्या अश्रुला मोल नाही!

२६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अमलात आणली गेली, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. घटनेने या देशातील सर्वाना सामान संधी दिली. २००८ च्या प्रजासत्ताक दिना निमित्याने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषानत राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल म्हणाल्या होत्या,  "देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. देशातील कमकुवत वर्गाला विसरून आपण उज्वल भविताव्याची कल्पनाच करू शकत नाही." राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल यानी अत्यंत विचारपूर्वक हे विचार मांडले आहेत. कारण आज आपल्या देशात ११ कोटि लोक केवल भिकेवर जगतात, ३४ कोटि लोक केवल २० रुपये रोजंदारीवर गुजरान करतात. राष्ट्रीय सव्रेक्षण विभागाच्या म्हानान्याप्रमने दर दिवसाला अन्न्याच्या अभावामुले आठ जन आत्महत्या करतात, अत्यंत कमी पैशात तंदुल, तेल देण्याच्या घोषणा केल्या जातात. निवदनुक होताच तय विसरल्या जातात, हे भारतीय जनतेला नवे नाही. आपल्या देशात जे  सत्ता लोभी आहेत त्यानाच फ़क्त सर्व हक्का मिलतात. गेल्या ६२ वर्षात किती मागास वर्गीय समाजातील तरुनान्ना नोकर्या मिलाल्या हे केंद्र सरकारने श्वेत पत्रिका काढून जाहिर करावे.
                                  गेल्या चार वर्षाच्या काळात महागाई बेसुमार वाढली आहे. लट्ठ पगार घेणारे अधिकारी सोडले तर सर्व सामान्य जनता व मध्य वर्गीय महागायीने त्रस्त जाले आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पाहता गोर गरीब मजुरांना किती पगार मिलतो, याची जाणीव लट्टा पगार घेनार्यान्ना अधिकारी वर्गाला होने आवश्यक आहे.  कुपोशनामुले मुले मृत्तुमुखी पडत आहेत. आदिवासिंसठी असलेली मदत त्यांचापर्यंत पोहोचू शकत नाही.कारण स्वातंत्र्य नंतर फ़क्त भ्रस्ताचर्ची पालेमुले खोलवर रुजली आहेत. या देशातील प्रतेक गरीबाच्या डोळ्यातील अश्रु पुसला गेला पाहिजे, असे सावरकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत आहे. 
       असो.............  
                 ६० वा प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो. 
                                                                                                        

                                                
                                                     बाबासाहेब जाधव, कुड़ोली 
                                                        from: दैनिक सकाळ
                                                       date: २६ जानेवारी २००९ 

Sunday, 11 January 2009

प्रिय राजकारन्यांस,

आज पर्यंत अनेक हल्ले जाले; पण मी मजयातली ताकद कमी करू दिली नाही; दहशद्वाद्यानी आपल्या मुंबई वर हल्ला केला. महाराष्ट्राच नव्हे, तर देशाच्या अस्मितेवरच तो घाला होता. बेछुत गोलीबार;अधूनमधून बोम्बचे धमाके होत होते. आपल्या देशाचे शुर ध्रेयाने अतिरेक्यान्शी लढले आणि शहीद जाले. दुख जाले; पण मी थरथरले नाही. माज़ा उर त्यंच्या बलिदानामुले स्वाभिमानाने फुलून गेला.दुख जाले; . नंतर मी सुन्न जाले अतिरेक्यामुले  नव्हे तर अतिरेकपनामुले. राजीनामा आणि नंतर मुख्यमंत्री निवाडिचे नाट्य पाहून मी खचले हो. एकीकडे अजुन शाहिदांच्या चितांची आगाही अजुन शांत जालेली नव्हती.  
                                              दुसरीकडे अनेकांच्या पोटात या पदांसाठी लागलेली आग मला सारखे चटके देत होती. हल्ल्यामुले आधीच अस्थिरता निर्माण जाली होती. त्यातच या राज्करानाने भर घातली. "मी सम्पेन नाही तर अमक्याला संपवीन" असे म्हनत एकाने चक्क नीरवानीरवीची भाषा केली.  आपणच आपल्या देशबांधवन्ना संपविनयाची भाषा केली, तर अतिरेक्यांना जास्त आटापीटाच करावा लागणार नाही. आहों थाम्बवा हा निर्लाज्जपना. हे सारे कशासाठी? फ़क्त मजयासठी ना? माज़ दुख कोण जानून   घेणार? अहो मला तुम्ही लोकानी फार खिलखिल करून टाकल आहे. मी फार भोगते आहे तुमच्यामुले. मी निरजीव आहे, मी बोलू शकत नाही; पण माजी वेदना जानुंन घ्यायची असेल?  तर माज्या सच्च्या देशभक्त, भोल्या जनतेने दहशदवादी हल्ल्यानंतर गाललेले अश्रु पहा. त्यात माज़च प्रतिबिम्ब दिसेल. जनेतेंच्या भावनाशी बेईमानी करू नका. नाहीतर एकदिवस मजयासठी तुम्ही 'वालवी' व्हाल. आणि माजी माती होउन जाइल? इश्वर तुम्हाला सदबुधि देवो. 
                                                                                                                                     कलावे,
                                                                                                                       आपली कृपा(?)भिलाशी  
                                                                                                                                    खुर्ची          



                                                         गुलजार गोलंदाज 
                                                      from: दैनिक सकाळ  
                                                      date : १८ दिसम्बर २००८                          

Monday, 5 January 2009

मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!!

वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र

मी मराठी मी मराठी

म्हटलं तर

का पडली इतरांच्या

कपाळावर आठी?.....

दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर

मराठी भाषेतली पाटी.....

बसायलाच हवी होती अशी

या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...

दूर केलीच पाहीजे ही

त्या लोकांची दमदाटी....

आता फुटली आहे मराठीपणाच्या

सहनशीलतेची पाटी...

ही राज नीती खरंच नाही बरं का

मराठी मतांसाठी ..

हा तर खरा आवाज आहे

मराठी अस्तित्वासाठी...

बोलतंय कुणीतरी आता

मराठी माणसासाठी...

राज तर पुकारतोय लढा

मराठीच्या रक्षणासाठी...

पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे

मराठी माणसाची गोची...

रोजच्या रोज माणसे येवून येवून

मुंबई भार सहन करेल तरी किती?

मुंबईच काय, ते तर शिरलेत आता

मुळा मुठा नदीच्याही काठी...

द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या

गुदमरलेल्या जीवासाठी ...
मराठी मनाससथी....
महाराष्ट्रासाठी.....
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!

Sunday, 7 December 2008

हम सब एक हे !

 अतिरेक्क्यानो...

मारून मारून मारल किती ?
हा १२५ कोटि चा देश आहे
तावुन-सुलाखून निघालो आम्ही
एकात्मता अजूनही शेष आहे

जिंक्ल्याची नशा चढेल ,
हा क्षण चा भास् आहे
१५० वर्षाचा लड़न्याचा
पाठीशी आमच्या इतिहास आहे

लपून-छापून लढता तुम्ही
औलाद तर भित्रयांची आहे
दिसली जी झलक आम्हाला
ती पागल कुत्र्याची आहे


तसे तुमचे नापाक इरादे ही
कधी पूर्ण होऊ शकत नाहीत
तिरंग्याची शपत आहे ,
आम्ही उगाचच बकत नाहीत

नाक उचलून बोलतो आम्ही
तुमच्या प्रमाने नकटे नाहीत
राहिल जग पाठीशी आमच्या
आम्ही काही एकटे नाहीत

आमच्या अभंगतेच्या कथा
तुम्हास कलुन चुकल्या आहेत
झाडल्या गोल्या ,फोडले बोंम्ब
तय आमच्यासाठी टिकल्या आहेत

हा गैरसमज कडून टाका
तुम्ही आम्हाला गुलाम करताल!
तुम्हीच `भारत माता की जय म्हाणित
तिरंग्याला सलाम करताल !!
जय भारत…….. जय महाराष्ट्र……

हम सब एक है