Wednesday, 26 August 2009

स्वातंत्र्यवीर सावरकर यांना तुरुंगावासात डांबून ठेवण्यासाठी त्यांना घेऊन लंडनवरून निघालेले एस्.एस्. मोरिया हे ब्रिटीश जहाज ७ जुलै १९१० रोजी फ्रान्सच्या मार्सेलीस बंदरात नांगरण्यात आले होते. वीर सावरकर यांनी या वेळी स्वत:ची सुटका करून घेण्याचे नक्की केले. या धाडसी प्रयत्‍नाचा जगभर चांगला परिणाम होईल व पूर्ण जग ब्रिटनच्या विरोधात होईल, असे सावरकर यांना वाटत होते. तुरुंगात कोंडून मरण्यापेक्षा धाडसी मरण पत्करणे चांगले. त्यातून जगाचे लक्ष भारताकडे वेधले जाईल, असा विचार करून ८ जुलै १९१० रोजी रोजी इंग्रजांच्या तावडीतून सुटका करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. संडासातील खिडकीतून त्यांनी पाण्यात उडी टाकली. त्यानंतर पोहून त्यांनी किनारा गाठला व सुटकेसाठी धूम ठोकली. त्यांना फ्रेंच पोलिसांनी अटक केली. त्यांचा सुटका करून घेण्याचा प्रयत्‍न फसला; मात्र त्यांचा हेतू साध्य झाला. जगभर ब्रिटनचे हसे झाले व प्रत्येक जण ब्रिटन सरकारला दोष देऊ लागले. सावरकरांच्या या धाडसी युक्‍तीने ब्रिटीश सरकारला पुढील दोन महिने नुसते हादरवून सोडले होते.गाजलेल्या या समुद्र उडिच्या शतक पुर्ती दिना निमित्त सावरकरांना शतशा प्रणाम....!!