Sunday, 25 October 2009

।शिवकल्याण राजा...............



.छत्रपती शिवाजी महाराजांनी............... - बालपणी, तरुणपणी शारीरिक सामर्थ्य वाढवण्यासाठी स्वत: कष्ट घेतले, - पराक्रमासाठी शस्त्रांचा अभ्यास केला, - साध्या -भोळ्या मावळ्यांचे संघटन करून त्यांच्यामध्ये निष्ठा व ध्येयवाद जागृत केला, - स्वत: शपथ घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्यात स्वत:ला घट्टपणे बांधून घेतले; - महत्त्वाचे गड-किल्ले जिंकले, नवे निर्माण केले, - योग्य त्या वेळी आक्रमण किंवा गरज पडेल त्या वेळी तह हे सूत्र कमालीच्या हुशारीने वापरून अनेक शत्रूंना नामोहरम केलेच, तसेच फितुरी, दगाबाजी, स्वराज्यांतर्गत कलहाचाही सामना केला, - आक्रमणाच्या वेळी गनिमी कावा तंत्राचा चातुर्याने वापर केला; - सामान्य रयतेची व्यवस्था, शेतकर्‍यांची व्यवस्था, लढवय्या शूर सरदारांची व्यवस्था, धार्मिक स्थानांची व्यवस्था… अशा अनेक व्यवस्था लावून दिल्या. - सर्वांत महत्त्वाचे म्हणजे छत्रपतींनी अष्टप्रधान मंडळाची स्थापना करून हिंदवी स्वराज्याच्या राज्यकारभाराची परिपूर्ण व्यवस्था निर्माण केली; - राजभाषा (मराठी) विकसित करण्याचा गांभीर्यपूर्वक प्रयत्न केला; विविध कलांना राजाश्रय दिला. - तसेच खचलेल्या, पिचलेल्या रयतेच्या मनामध्ये स्वाभिमानाचा, पराक्रमाचा, स्वराज्य निष्ठेचा हुंकार जागृत केला. या सर्व गोष्टी त्यांनी साध्य केल्या अवघ्या ५० वर्षांच्या आयुष्यात! सतराव्या शतकात जागृत झालेला तो स्वाभिमान, ती स्वराज्यनिष्ठा आजही महाराष्ट्राला प्रेरणा देते. महाराष्ट्र धर्म वाढवण्याची स्फूर्ती देते.


निश्र्चयाचा महामेरू, बहुतजनांसी आधारू, अखंडस्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी ।।
नरपती, हयपती, गजपती। गडपती, भूपती, जळपती।
पुरंदर आणि शक्ति पृष्ठभागी।।
यशवंत, कीर्तीवंत, सामर्थ्यवंत।
वरदवंत, पुण्यवंत, नीतीवंत। जाणता राजा ।।
आचरशील, विचारशील, दानशील।
धर्मशील सर्वज्ञपणे सुशील। सकळाठाई ।।
धीर उदार गंभीर। शूर क्रियेसी तत्पर ।
सावधपणे नृपवर तुच्छ केले।।
देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण।।
हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली
या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही।
महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारणी।।
कित्येक दृष्ट संहारली। कित्येकासी धाक सुटला ।
कित्येकाला आश्रयो जाहला ।
शिवकल्याण राजा। शिवकल्याण राजा।।शिवकल्याण राजा।




* शेर शिवराज है ! *******
इन्द्र जिमि जंभ पर,
वाढव सुअंभ पर,
रावण सदंभ पर,
रघुकुलराज है!
पौन बारिबाह पर,
संभु रतिनाह पर,
ज्यो सहसबाह पर,
राम द्विजराज है!
दावा द्रुमदंड पर,
चीता मृगझुंड पर,
भूषन वितुंड पर,
जैसे मृगराज है!
तेज तम अंस पर,
कान्ह जिमि कंस पर
त्यों मलिछ बंस पर,
सेर सिवराज है!
"जय भवानी",
"जय शिवाजी"!!









!









शिवाजींचा मावळा आहे मी,
बाजीरावांचा चाहता आहे मी,
मराठी शौर्य गाणार्‍या शाहिरीच्या
डफ़ावरची थाप आहे मी...


विठोबाची वीट आहे मी,
तुकयाचे गीत आहे मी,
मराठी साहित्य ऊमलते जिथे जिथे
तिथे हुन्दडणारा एक ऊनाड वारकरी आहे मी,

अनादि अनंत मराठीचा पुत्र आहे मी,
मराठी म्हणून जन्मलो...परमेश्वराचा आभारी आहे मी,
मायमराठीचा इतका अभिमान आहे मला की,
मराठीवर प्रेम करणार्‍या प्रत्येकाचा आहे मी...

मला धर्म काळात नाही.फक्त मराठी आहोत एवढेच मला माहिती आहे.मराठी माणसाने जातीपतिना गाडून एकवाटल्यास कोणीही डोळा वाकडा करून पाहण्याची हिंमत करणार नाही .
हा महाराष्ट्र फक्त मराठी माणसाचा आहे इथे कोणी परकिया येऊन मराठी माणसांवर अत्याचार करत असेल तर ते सहन केले जाणार नाही.
इथे फक्त मराठीतच बोलले पाहिजे.आणि आपण सगळे मराठी आहोत हे समजूनाच राहीले पाहिजे.
इथे फक्त महराष्ट्रा दिनच साजरा केला जावा.
इतर लोकांचे लाड खपवून घेतले जाणार नाही.
मराठी लोकाना वाघासारखे जगायला सिखा. तरच मराठी माणूस टिकेल.
.........................................................................जय महाराष्ट्र!!!!!!!!!!