वाघ तर वाघ असतो.... त्याचा कोणी वाली नसतो....महाराष्ट्रात राहून जो मराठी जपतो.... त्याचाच फ़क्त "राज" असतो जय हिंद जय महाराष्ट्र
मी मराठी मी मराठी
म्हटलं तर
का पडली इतरांच्या
कपाळावर आठी?.....
दिसलीच पाहीजे सगळया दुकानांवर
मराठी भाषेतली पाटी.....
बसायलाच हवी होती अशी
या दादा लोकांवर मराठीपणाची काठी...
दूर केलीच पाहीजे ही
त्या लोकांची दमदाटी....
आता फुटली आहे मराठीपणाच्या
सहनशीलतेची पाटी...
ही राज नीती खरंच नाही बरं का
मराठी मतांसाठी ..
हा तर खरा आवाज आहे
मराठी अस्तित्वासाठी...
बोलतंय कुणीतरी आता
मराठी माणसासाठी...
राज तर पुकारतोय लढा
मराठीच्या रक्षणासाठी...
पाहा सगळ्या क्षेत्रात काय झाली आहे
मराठी माणसाची गोची...
रोजच्या रोज माणसे येवून येवून
मुंबई भार सहन करेल तरी किती?
मुंबईच काय, ते तर शिरलेत आता
मुळा मुठा नदीच्याही काठी...
द्या सगळे मिळून लढा मराठी मातेच्या
गुदमरलेल्या जीवासाठी ...
मराठी मनाससथी....
महाराष्ट्रासाठी.....
मी महाराष्ट्राचा महाराष्ट्र माझा !!!!!!
Monday, 5 January 2009
Subscribe to:
Post Comments (Atom)
1 comment:
nice
jai maharashtra
Post a Comment