Monday, 26 January 2009

गरिबांच्या अश्रुला मोल नाही!

२६ जानेवारी १९५० रोजी भारताची राज्यघटना अमलात आणली गेली, तेव्हापासून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. घटनेने या देशातील सर्वाना सामान संधी दिली. २००८ च्या प्रजासत्ताक दिना निमित्याने राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषानत राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल म्हणाल्या होत्या,  "देशाच्या आर्थिक विकासाचा लाभ सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. देशातील कमकुवत वर्गाला विसरून आपण उज्वल भविताव्याची कल्पनाच करू शकत नाही." राष्ट्रपति प्रतिभाताई पाटिल यानी अत्यंत विचारपूर्वक हे विचार मांडले आहेत. कारण आज आपल्या देशात ११ कोटि लोक केवल भिकेवर जगतात, ३४ कोटि लोक केवल २० रुपये रोजंदारीवर गुजरान करतात. राष्ट्रीय सव्रेक्षण विभागाच्या म्हानान्याप्रमने दर दिवसाला अन्न्याच्या अभावामुले आठ जन आत्महत्या करतात, अत्यंत कमी पैशात तंदुल, तेल देण्याच्या घोषणा केल्या जातात. निवदनुक होताच तय विसरल्या जातात, हे भारतीय जनतेला नवे नाही. आपल्या देशात जे  सत्ता लोभी आहेत त्यानाच फ़क्त सर्व हक्का मिलतात. गेल्या ६२ वर्षात किती मागास वर्गीय समाजातील तरुनान्ना नोकर्या मिलाल्या हे केंद्र सरकारने श्वेत पत्रिका काढून जाहिर करावे.
                                  गेल्या चार वर्षाच्या काळात महागाई बेसुमार वाढली आहे. लट्ठ पगार घेणारे अधिकारी सोडले तर सर्व सामान्य जनता व मध्य वर्गीय महागायीने त्रस्त जाले आहेत. सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी पाहता गोर गरीब मजुरांना किती पगार मिलतो, याची जाणीव लट्टा पगार घेनार्यान्ना अधिकारी वर्गाला होने आवश्यक आहे.  कुपोशनामुले मुले मृत्तुमुखी पडत आहेत. आदिवासिंसठी असलेली मदत त्यांचापर्यंत पोहोचू शकत नाही.कारण स्वातंत्र्य नंतर फ़क्त भ्रस्ताचर्ची पालेमुले खोलवर रुजली आहेत. या देशातील प्रतेक गरीबाच्या डोळ्यातील अश्रु पुसला गेला पाहिजे, असे सावरकरांचे स्वप्न होते. ते स्वप्न आजही पूर्ण होऊ शकले नाही, ही खंत आहे. 
       असो.............  
                 ६० वा प्रजासत्ताक दिन चिराऊ होवो. 
                                                                                                        

                                                
                                                     बाबासाहेब जाधव, कुड़ोली 
                                                        from: दैनिक सकाळ
                                                       date: २६ जानेवारी २००९ 

1 comment:

Unknown said...

nice sentence
actully this is very imp for now days